(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : अमित शाह मुंबईतून काहीही उचलून नेऊ शकतात - राऊत
Sanjay Raut : अमित शाह मुंबईतून काहीही उचलून नेऊ शकतात - राऊत
पुण्यातील पौडफाटा परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये (Pune Accident) एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मनसे (MNS) पदाधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. पौडफाटा परिसरात झालेल्या अपघातात एका टेम्पो चालकाने श्रीकांत अमराळे (Shrikant Amrale) आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले. हा टेम्पो चालक दारुच्या नशेत होता.
प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा अपघात घडला. टेम्पो चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत करिश्मा चौकातील गाड्यांना धडक देत जात होता. त्याचा टेम्पो करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. आशिष पवारने दारुच्या नशेत टेम्पो त्यांच्या अंगावर घातला. यामध्ये गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला.