Sanjay Raut : Maratha Reservation प्रकरणार तोडगा काढला नाही तर मुंबईत हाहाकार होईल ABP Majha
मुंबई : मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्वाखालील मराठा मोर्चा (Maratha Morcha) मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय.तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते माहित नाही. परंतु त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते, काय उपटत होते माहीत नाही. त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे. गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का? हे टपोरी लोक आहेत. हे खोके वाटप करायला ठीक आहे शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ असलं पाहिजे.