Sanjay Raut Full PC : Rahul Gandhi यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता
Sanjay Raut : वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले. हा विषय काढल्यामुळं फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.





















