Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंचा फोन, उद्धवही म्हणाले चालेल! जे जे घडलं...तेते सांगितलं
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंचा फोन, उद्धवही म्हणाले चालेल! जे जे घडलं...तेते सांगितलं
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्याविरोधात 5 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray) हे एकत्र येणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (27 जून) ही घोषणा केली. तसेच मला काल (26 जून) राज ठाकरेंचा फोन आला होता, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. आज माध्यमांशी बोलताना काल नेमकं काय काय घडलं?, याबाबत सर्व माहिती संजय राऊतांनी दिली.
राज ठाकरे यांनी मला फोन केला. मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणे योग्य नाही. एकच मोर्चा निघायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. याबाबत उद्धव ठाकरेंना मी बोललो की, मला राज ठाकरेंचा फोन आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा आढेवेढे न घेता तयार झाले. मराठी ऐक्य दिसले पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 6 तारखेला मनसे पुरस्कृत मोर्चा होता. मी परत राज ठाकरे यांना फोन करून सांगितलं की, आषाढी एकदशी आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी 5 जुलै ही तारीख ठरवल्याचं संजय राऊतांनी सांगितले.





















