Sangita Rathod बंजारा समाजाच्या वेशभूषेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहरादेवीत : ABP Majha
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज 593 कोटी रुपयांच्या विकासकामाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी भव्य तयारी स्थानीक आमदार संजय राठोड यांनी केली आहे. मागील काळात संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप आणि त्यानंतर राठोड यांनी शिंदे गटात केलेला पक्षप्रवेश यानंतर ठाकरे गटाकडून प्रचंड प्रमाणात संजय राठोड यांच्यावर होणारी टीका यामुळे संपुर्ण समाज आपल्याच बाजूने असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न संजय राठोड यांच्या वतीने होत आहे. त्यामुळेंच आज संजय राठोड यानी भव्य दिव्य कार्यक्रमाच आयोजन पोहरादेवी येथे करत एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केलं आहे. हा कार्यक्रम राठोड कुटुंबीयांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या कार्यक्रमासाठी संजय राठोड यांच्या पत्नी संगीता राठोड या पारंपरिक बंजारा समाजाचा वेशभूषेत कार्यक्रमाला उपस्थित आहेत