Sana Khan Case : सना खान प्रकरणात महेंद्र यादवला अटक, गुढ उकलणार?
Sana Khan Case : सना खान प्रकरणात महेंद्र यादवला अटक, गुढ उकलणार?
सना खान हत्याकांड प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. सना खान यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादवला पोलिसांनी अटक केलीय. सना खान यांचा मृतदेह अजून सापडलेला नाही. अमित साहूला भेटायला त्या १ ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. त्यानंतर २ ऑगस्टला त्यांच्यात भांडण झालं. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. मात्र, महेंद्र यादवला अटक केल्यामुळे बरीच माहिती उघड होण्याची शक्यता आहे. एक मृतदेह सापडला असून तो सनाचा नसल्याचा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे. त्याची डीएनए चाचणी होणार आहे.

















