Samruddhi Mahamarg Toll : समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी 900 रुपयांचा टोल
समृद्धी महामार्गावर प्रवास केल्यानंतर खरी समृद्धी कुणाची होणार हा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो.. कारण समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी या टप्प्याच्या प्रवासासाठी ९०० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाच्या प्रवासासाठी तब्बल 900 रुपयांचा टोल असेल. तर मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच अंतर 701 किलोमीटर असून त्यासाठी तब्बल बाराशे रुपयांचा टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. जितका प्रवास तितका टोल या तत्त्वानुसार ही टोल वसुली केली जाणार. समृद्धी महामार्गासाठी प्रत्येक किलोमीटरला एक रुपया बहात्तर पैसे एवढा टोल आकारला जाणार. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा 520 किलोमीटरचा आहे त्यामुळे 900 रुपयांचा टोल भरावा लागणार. पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गासाठी दोन रुपये 95 पैशांचा प्रति किलोमीटर दर आहे. तर समृद्धी महामार्गासाठी एक रुपया बहात्तर पैसे प्रति किलोमीटर दर असणार आहे,. नागपूर शिर्डी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 19 एक्झिट पॉईंट वरती हे टोलनाके असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला शिर्डी- नागपुर या पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाच उद्घाटन होणार आहे























