Sachin Kharat : संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याने परभणी बंदची हाक
Sachin Kharat : संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याने परभणी बंदची हाक
महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता राजकीय वर्तुळाला मंत्रिमंडळ विस्ताराचे (Maharashtra Cabinet) वेध लागले आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरुवातीपासूनच गृहमंत्रीपदाचा तिढा असताना आता मर्यादित खाती मिळणार असल्याने मंत्रिपदी कोणाला संधी द्यायची, यावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या 57 आमदारांपैकी जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यासाठी एक वेगळाच पॅटर्न अंमलात आणायचे ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता शिवसेनेच्या आमदारांना फिरती मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सध्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाची चर्चा सुरु आहे. गेल्यावेळी संधी हुकलेल्या शिवसेनेतील अनेक आमदारांना यंदा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात होणार नाही, काही मंत्रिपदे पुढील विस्तारासाठी राखून ठेवली जातील. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला आठ ते दहापेक्षा जास्त मंत्रिपदे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे इच्छूक आमदारांची नाराजी थोपवून धरण्यासाठी अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रीपदे देण्याचा तोडगा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्याचे वृत्त 'दैनिक लोकसत्ता'मध्ये प्रसिद्ध झाले आहे.