Rupali Chakankar: 'व्हायरल वक्तव्य तात्काळ काढून टाका'- रुपाली चाकणकर ABP Majha
दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बंडातात्या कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आज सकाळी सातारा पोलीस बंडातात्या यांच्या फलटणमधील कराडकर यांच्या मठात पोहोचले. यावेळी पोलिसांनी कराडकर यांना मठातून ताब्यात घेतलंय. आता सातारा पोलीस कराडकर यांची चौकशी करणार आहेत.



















