एक्स्प्लोर

Rohit Pawar vs Sunil Tatkare : जागावाटपाचा मुद्दा; विरोधकांची टीका

Rohit Pawar vs Sunil Tatkare : जागावाटपाचा मुद्दा; विरोधकांची टीका महायुतीमध्ये (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी होण्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीमध्ये (Delhi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत कशा बैठका केल्या, याबाबत भाष्य केले. मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करत होतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. यावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.   दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये 10 बैठका झाल्या होत्या. या बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहराव करून दिल्लीला जायचो. मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो, असे वक्तव्य त्यांनी केले. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.   स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीला टोपी घातली यावरून रोहित पवार म्हणाले की, अजित पवार हे धडाडीचे दादा म्हणून आम्हाला माहीत होते. आत्ताचे भाजपसोबत गेलेले अजित दादा यांना सर्व गोष्टी विचाराव्या लागतात. एखादी सही केल्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याकडे त्यांची फाईल जाते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाते. दादांनी टोपी तुम्ही घातली असावी. पण, आपण लोकसभेमध्ये बघितलं तर स्वाभिमानी जनतेने त्यांच्या पार्टीला टोपी घातली आहे, असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे.   बारामतीत लढत होईल, असा उमेदवार देणार बारामतीत विधानसभा निवडणुकीसाठी कुठला उमेदवार देणार अशी विचारणा केली असता रोहित पवार म्हणाले की, बारामतीत योग्य असा उमेदवार देऊ, राजनीतीचा तो भाग आहे. पुढील वीस दिवसात समजेल की तिथे उमेदवार कोण असेल, उमेदवार जो कोणी असेल, योग्य उमेदवार तिथे दिला होता. तिथे खूप चांगली लढत आमच्याकडून होईल, असे त्यांनी म्हटले.   रोहित पवारांचा मिसळीवर ताव  रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मिसळचा आस्वाद घेतला. यावेळी ते म्हणाले की, मिसळ ही आपल्या महाराष्ट्राचे डिश आहे. सामान्य लोकांचे प्रतीक आहे. जेव्हा पण मी एखाद्या बैठकीला जातो, त्यावेळेस कार्यकर्त्यांसोबत प्रसिद्ध हॉटेलवर जाऊन मला खायला आवडतं. रामकृष्ण हरी, मिसळ आमची भारी असं म्हणण्याची वेळ आज आहे, असे त्यांनी म्हटले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget