Rohit Pawar : महायुती काॅपी पेस्ट उमेदवार जाहीर करत आहे - रोहित पवार
Rohit Pawar : महायुती काॅपी पेस्ट उमेदवार जाहीर करत आहे - रोहित पवार
हेही वाचा
वरळी विधानसभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र त्यांना आमदारकी लढण्यासाठी उतरवले जाण्याची चिन्हं आहेत. सध्या वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेने संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडूनही उमदेवार उतरवला जात आहे. त्यामुळे वरळी विधानसभेत तिहेरी लढत होण्याची चिन्हं आहेत.
आदित्य ठाकरे यांनी 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. मात्र यावेळी त्यांना घेरण्याची तयारी महायुती आणि मनसेने केल्याचं दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाचेही माजी खासदार आहेत. त्यामुळे जर मिलिंद देवरा यांना शिंदे यांच्या शिवसेनेने मैदानात उतरवलं तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.