Sharad Pawar on Rohit Pawar : रोहितची नंतरची पाच वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी, शरद पवारांकडून संकेत
Sharad Pawar on Rohit Pawar : रोहितची नंतरची पाच वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी, शरद पवारांकडून संकेत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी काळात आ. रोहित पवार मंत्री असतील असे सूचक वक्तव्य केलं... विशेष म्हणजे त्यांनी आपण स्वतः कसे मुख्यमंत्री झालो याचा घटनाक्रम देखील सांगितला... माझी (शरद पवार) पाच वर्षे आमदार म्हणून गेल्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण हे मला मिळत गेलं... मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो, सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री राहिलो... वसंत दादांचा सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो... आणि केवळ एकदाच मुख्यमंत्री झालो नाही तर चार वेळेला मुख्यमंत्री झालो... हा घटनाक्रम सांगितल्यानंतर त्यांनी रोहित पवार यांच्या मंत्री होण्याबाबत सूचक वक्तव्य करत "रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी" असं म्हणत शरद पवार यांनी रोहित पवारांच्या आगामी मंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केलं... विशेष म्हणजे "महाराष्ट्राची सेवा ही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल" असं सूचक वक्तव्य पवारांनी केले...शरद पवारांनी स्वतःचा राज्यमंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगत एक प्रकारे रोहित पवार यांचा देखील मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास तर सांगितला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे... रोहित पवार यांच्या मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात शरद पवार बोलत होते.