एक्स्प्लोर
Sunil Tatkare : शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, तटकरेंची थोरवेंवर टीका
रायगड (Raigad) जिल्ह्यातील राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर तापले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांना धक्का देत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. 'कोणाच्यातरी घाणघाई लागली, कोणाच्यातरी अफवा प्रवर्तनाला बाजूला सारलं, हे सगळे तरुण एका विचाराच्या माध्यमातून पक्षामध्ये येत आहेत', असे म्हणत सुनील तटकरेंनी आमदार थोरवेंवर निशाणा साधला. या पक्षप्रवेशामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना, जे राज्यातील महायुतीचे (Mahayuti) घटक पक्ष आहेत, त्यांच्यातील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. निवडणुकांनंतरही तुमचे नेते सुनील तटकरे आणि सुधाकर घागरे हेच असतील, याची आठवणही तटकरेंनी कार्यकर्त्यांना करून दिली.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















