Retreating Monsoon : राज्यातील काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ ABP Majha
ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकुळ घातलाय.. अहमदनगर, पुणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढलंय.. नगरमधील कोपरगावात काल मुसळधार पाऊस झाला.. त्यामुळे चांदेकसारे, आनंदवाडी, झगडेफाटा या गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. तर बारामतीतही झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामती- भिगवण मार्गावर पाणी साचलं होतं... तांदूळवाडी परिसरातील शिवनगरमध्ये काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीये..महामार्गावर जवळपास तीन ते चार किलोमीटरच्या लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्यात.. पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेय..


















