Ration Machine Issue : मशिनमध्ये बिघाड, गरिबांची चूल कशी पेटणार?
Ration Machine Issue : मशिनमध्ये बिघाड, गरिबांची चूल कशी पेटणार? ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन, रेशन वाटप ठप्प 92 हजारावर शिधापत्रिकाधारक रेशनपासून वंचित अँकर : रेशन घोटाळा रोखणे, लाभार्थीना थेट लाभ मिळावा, यासाठी सरकारने राज्यातील रेशन दुकानदारांना नवीन ई-पॉस मशीन वाटप केल्या आहेत. यात जिल्ह्यातील 2 हजार 43 रेशन दुकानदारांचा समावेश आहे. मात्र, नवीन ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन आहे. नेट कनेक्ट होत नाही. तांत्रिक अडचण असल्याने रांगेत उभे राहूनही लाभार्थींचे थम्ब होत नाही. धान्यही मिळत नाही. उमरसरा परिसरामध्ये राहणाऱ्या ममताबाई काळे यांच्याकडे दारिद्र्यरेषेखालील पिवळे अंतोदयचे रेशन कार्ड आहे. त्यांना दरमहा 35 किलो धान्य मिळते घरात पाच जण आहे. मात्र मागील महिनाभरापासून ही पॉज मशीन बंद असल्याने व नवीन मशीनचे कनेक्टिव्हिटी होत नसल्याने धान्य घेण्यासाठी चक्र मारावे लागत आहे मात्र दुकानदाराकडून धान्य मिळत नाही अशातच सलग दहा दिवसापासून पाऊस असल्याने मजुरी बोलत आहे त्यामुळे लवकर धान्य मिळावे अशी अपेक्षा ह्या व्यक्त करीत आहे 121 - ममता काळे, अंतोदय दारिद्र्यरेषेखाली कार्ड धारक लाभार्थी