Nagpur Fake Degreeराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावाने 27 बोगस डिग्रीप्रकरण उघडकीस
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस डिग्री बनवून थेट इराक मध्ये अनेकांनी नोकऱ्या मिळवल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अशा 27 तरुणांबद्दल इराक सरकारने भारतातील इराक दुतावासाकडे संपर्क साधलाय. त्यानंतर इराकच्या भारतातील दूतावासाने नागपूर विद्यापीठाला संपर्क साधला तेव्हा त्या 27 तरुणांचा नागपूर विद्यापीठाची कधीही शैक्षणिक संबंध आलेला नसल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे हे 27 तरुण नागपूर विद्यापीठाच्या हद्दीतील कुठल्याही महाविद्यालयात शिकलेले नाही, आणि त्यांच्या नावाची नोंदणीही नाही... त्यामुळे नागपूर विद्यापीठाने इराक दूतावासाला या सर्व 27 डिग्री बोगस असल्याचे सांगितले आहे.. विशेष बाब म्हणजे 27 बोगस डिग्री पैकी बहुतांशी प्रकरणे २०१९ आणि २०२० मधील आहेत. त्या काळात देशावर कोरोनाचं संकट होतं.



















