Ramesh Bornare : आमदार रमेश बोरनेरेंकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण, पोलिसांत तक्रार
Ramesh Bornare : आमदार रमेश बोरनेरेंकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण, पोलिसांत तक्रार
शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी भाजपच्या एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केल्याची तक्रार अर्ज वैजापूर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.कैलास पवार असे तक्रार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याचे नावे असून रस्त्याच्या कामावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.पवार यांनी दिलेल्या तक्रारी त्यांच्या राहत्या घरासमोर रस्त्याचे काम सुरू आहे.तेव्हा पवार हे प्लॉट वर गेले असता तेथे रमेश बोरनारे यांच्यासह काही कार्यकर्ते हे अगोदरच उपस्थित होते.यावेळी नगर पालिकेचे इंजिनिअर देखील उपस्थित होते.बोरनारे यांनी प्लॉट नंबर 48 मधून रस्ता करा असे ठेकेदाराला सांगितले यानंतर पवार यांनी इंजिनिअर जोरे यांना रस्ता करण्या अगोदर एन ए लेआऊट बघून घ्या असे म्हणाले.यावर बोरनारे यांनी शिवीगाळ करून तुझा जुना हिशोब चुकता करायचा आहे तुला इथे राहू देणार नाही असे म्हणत कार्यकर्त्यांसह मारहाण केली अशी लेखी तक्रार दिली आहे.बोरनारे यांनी पोलिसांवर दबाव आणून आपला गुन्हा दाखल करू दिला नाही असा आरोपही पवार यांनी केला आहे.
मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे...























