एक्स्प्लोर
Special Report Shaniwarwada: 'शनिवारवाड्यात नमाज,परिसरात गोमूत्र शिंपडून 'शुद्धीकरण', हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यामध्ये (Shaniwar Wada) नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी (MP Medha Kulkarni) आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'माझं पुरातत्व विभागाच्या लोकांशी बोलणं झालेलंय आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की यापुढे कुठल्याही मुस्लिमाला आता एंट्री देऊ नका,' असे वक्तव्य करत मेधा कुलकर्णी यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पतितपावन संघटना आणि सकल हिंदू समाजाने शनिवारवाडा परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. आंदोलकांनी जवळच्या हजरत सय्यद शहा पीर मकबूल हुसेनी दर्ग्यावरही हिरवे झेंडे काढून भगवे झेंडे लावले आणि तो अनधिकृत असल्याचा दावा केला. आगामी पुणे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी हे स्थळ पुरातत्व विभागाच्या (ASI) अखत्यारीत असून, त्यांच्या तक्रारीनंतर योग्य कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















