Pune Monsoon Update : पुण्यात पद्मावती नगर सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली
Pune Monsoon Update : पुण्यात पद्मावती नगर सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली
काल झालेल्या मुसळधार पावसाने पद्मावती परिसरातील पद्मावती नगर सोसायटीची संरक्षण भिंत खालच्या घरांवर कोसळली. भिंत आणि सोसायटीची c विंग धोकादायक आहे त्यामुळे महापालिकेने सोसायटीतील सी विंग मधील नागरिकांना घर खाली करण्याची नोटीस रात्री ११ वाजता दिली. मात्र आमच्या सोसायटीची भिंत धोकादायक नाही शिवाय खालच्या घरांची जागा देखील सोसायटीची असल्याचा दावा सोसायटीमधील रहिवाश्यांनी केलाय जो पर्यंत तांत्रिक बाबी समोर आणून आम्हाला धोकादायक असल्याचा पुरावा तोपर्यंत घर खाली करणार नाही, अस थांब मत सोसायटीच्या रहिवाश्यांनी व्यक्त केलंय.
हे ही वाचा..
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon Rains) जोरदार बॅटिंग करत अक्षरक्ष: झोडपून काढले आहे., मंगळवारी (20 मे) संध्याकाळपासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह तूफान पाऊस झालाय. तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. परिणामी, राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. अशातच 22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.























