एक्स्प्लोर
Pune Land Scam: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा? काँग्रेस आक्रमक
पुण्यातील कथित जमीन घोटाळ्यावरून (Pune Land Scam) राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही,' असा दावा पटोले यांनी केला आहे. ही जमीन महार वतनाची (Mahar Vatan Land) असून, तिची मूळ किंमत १८०० कोटी रुपये असताना बेकायदेशीरपणे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) स्थापन करून काही साध्य होणार नाही, असे म्हणत पटोले यांनी थेट कारवाईची मागणी केली आहे. या घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करून मूळ मालकांना, म्हणजेच महार वतन समाजाला, जमीन परत करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लवकरच पुण्यात जाऊन याप्रकरणी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















