एक्स्प्लोर
Pune Ganesh Visarjan | ३० तास उलटूनही मिरवणुका सुरूच, जुना Record मोडला!
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुका सलग तीस तासांहून अधिक काळ सुरू आहेत. काल सकाळी नऊ वाजता मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली होती. पाचही मानाचे गणपती आणि दगडूशेठ गणपतीचे विसर्जन वेळेत झाले. मात्र, इतर अनेक गणपती मंडळे अजूनही विसर्जनासाठी ताटकळली आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत अलका चौकातून सुमारे २३२ मंडळे विसर्जनासाठी पुढे गेली होती, परंतु अजूनही नऊ ते दहा मंडळे अलका चौकात पोहोचलेली नाहीत. गेल्या वर्षी सुमारे २८ तास मिरवणुका चालल्या होत्या, परंतु यंदा हा विक्रम मोडला गेला आहे. तीस तास उलटूनही मिरवणुका सुरूच असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. डीजे वाजवणाऱ्या गणपती मंडळांमुळे मिरवणुका रेंगाळल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलिसांनी मानाच्या गणपती मंडळांना आणि इतर मंडळांना विसर्जनासाठी एक निश्चित वेळापत्रक दिले होते. त्यानुसार मानाची मंडळे वेळेत आली आणि त्यांचे विसर्जन झाले. रात्री बारा वाजता शहरातील डीजे मंडळे थांबवण्यात आली होती, त्यानंतर ढोलताशा मंडळांनी त्यांच्या बाप्पांचे विसर्जन केले. मात्र, डीजे असणारी आणि देखाव्याची काही मंडळे जागेवरच थांबून होती. आज सकाळी सहा वाजेपासून पुन्हा डीजे मिरवणुका सुरू झाल्या आणि दुपारी चार वाजेपर्यंतही त्या थांबलेल्या नाहीत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















