(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात अनेक अल्पवयीन मुलं दारूच्या नशेत असल्याचं समोर
Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात अनेक अल्पवयीन मुलं दारूच्या नशेत असल्याचं समोर पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् एकच खळबळ माजली. पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर प्रशासनाकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली. पोलीस दलातील दोन बिट मार्शल यांचं निलंबन करण्यात आलेय. कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधित हॉटेलही सील करण्यात आले आहे. पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. हॉटेलमधील पाच जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. हॉटेलमधील ज्या ठिकाणी परवानगी नव्हती, तिथे सुद्धा मद्य साठा ठेवला होता, त्याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. हॉटेलमधील एका मजल्यावर मद्याचा साठा ठेवण्यात आला होत्या. त्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. नेमकं प्रकरण काय ? पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळे, पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे.