Subhash Desai at Book Publishing: रमेश अंधारे लिखित 'मोहरा महाराष्ट्राचा' प्रकाशीत ABP Majha
ग्रंथाली आणि राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवानिमित्त मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते तीन खंडांचं आज प्रकाशन करण्यात आलं. रमेश अंधारे लिखित मोहरा महाराष्ट्राचा, श्रीपाद जोशी आणि अजय देशपांडे लिखित मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान आणि विवेक पाटकर लिखित विज्ञान तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र या तीन खंडांचं आज प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्याचं आज मंत्रालयात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी डी पाटील, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते हे उपस्थित होते. या सोहळ्यात डॉ. पी डी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


















