Preetam Munde Rally : दसरा मेळाव्याआधी फुलांची उधळणं करुन प्रीतम मुंडेंचं जोरदार स्वागत
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या निमित्त भगवान भक्तीगडावर जाण्याआधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर पोहचल्या तेव्हा कार्यकर्त्यांकडून त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सकारात्मक ऊर्जेनं पुढील वर्षभर काम करण्याचा मानस प्रीतम मुंडेंनी बोलून दाखवला. गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर थोड्या वेळानं प्रीतम मुंडे सावरगावला भगवानबाबांचं दर्शन घेणार आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
