Prakash Ambedkar Latur : शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सँडवीच व्हायचं नसेल तर काँग्रेस आमची ऑफर स्वीकारेल
Prakash Ambedkar Latur : शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सँडवीच व्हायचं नसेल तर काँग्रेस आमची ऑफर स्वीकारेल प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये येणार होते मात्र त्यांच्या मनात काय चाललं आहे हे लक्षात येत नाही असं मत नाना पटोले यांनी काल लातूरमध्ये व्यक्त केलं होतं. त्याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले संबंध उघड झाले आहे. त्याच्यावर लक्ष ठेवत काँग्रेस पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातच यामुळे संभ्रम आहे. सध्या काँग्रेसमध्ये जे होत आहे ते काही बरोबर नाही असे त्यांची धारना आहे. अशी परिस्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसवाले जर तयार असेल तर एकत्र आम्ही विधानसभा लढू मात्र आत्ताच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सँडविच होत आहे. काँग्रेस पक्षाला जर सँडविच व्हायचं नसेल तर ते आमचे ऑफर नक्कीच स्वीकारतील. असेही प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केले..