एक्स्प्लोर

Pooja Khedkar Police Notice : पूजा खेडकरांना पुणे पोलिसांकडून दुसरी नोटीस;खेडकर अजून वाशिममध्येच

IAS Pooja Khedkar Case : पुणे : खेडकर कुटुंबाच्या (Khedkar Family) अडचणीत आणखी वाढ होणार आहे. खेडकर कुटुंबाची थर्मोव्हेरिटा कंपनी ही अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे. 2 लाख 77 हजारांचा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड मनपानं (Pimpri Chinchwad Municipal Corporation) याआधीच ही कंपनी सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच आता ही कंपनीच अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे. रेडझोनमध्ये कंपनी उभारल्यामुळे ती अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालं आहे.  

आता खेडकरांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असून खेडकरांच्या कंपनीवर लवकरच हातोडा पडणार आहे. याच अनुषंगानं पिंपरी पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात झाली आहे. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी याच थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता रहिवासी पत्ता म्हणून दिला होता. पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी एबीपी माझाला यासंदर्भात एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे.

पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "यासंदर्भात रेकॉर्ड तपासल्यानंतर असं दिसून आलं की, 2009 पासून कर भरला जात होता, शेवटचा कर 2022 मध्ये भरण्यात आला. आतापर्यंतचा थकीत कर पाहिला तर तब्बल 2 लाख 77 हजारांचा थकीत कर आहे. त्यामुळे नियमानुसार, प्रॉपर्टी जप्त करण्याची जी कारवाई आहे, ती सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमात तरतूद आहे. जर एखाद्या प्रॉपर्टीवर कर देण्यात कोणी हलगर्जीपणा करत असेल किंवा कर वेळेत भरत नसेल, तर ती प्रॉपर्टी जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता स्थिर करतो, त्या नियमानुसार आपली कारवाई केली जाईल."

"कंपनी ज्या भागात येते, तो भाग रेड झोनमध्ये येतो, त्यामुळे त्या भागातील सर्व कंपन्या अनधिकृत आहेत. त्यामुळे या कंपनीवर कारवाई केली जाईल. नियमांनुसार, अनधिकृत इमारत असेल, तर संबंधित मालकांना एक महिन्यांची नोटीस दिली जाते. त्यानंतर जी काही योग्य कारवाई असले, ती त्यांच्यावर केली जाते.", असं पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितलं आहे. 

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आयएएस पूजा खेडकरांनी केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं होतं. मात्र, यासाठी रहिवाशी ऐवजी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा पत्ता त्यांनी वापरला होता. त्यामुळं पिंपरी पालिकेचा कर थकविणाऱ्या या कंपनीचं आता काय होणार? असा प्रश्न विचारला जात असतानाच ही कंपनी अनधिकृत असल्याचं देखील आता समोर आलं आहे. 

2 लाख 77 हजार 688 रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी पालिकेनं ही कंपनी सील करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच ही कंपनी अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे, त्यामुळे आता खेडकरांच्या कंपनीवर लवकरचं हातोडा पडणार आहे. त्याअनुषंगानं पिंपरी पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात झाली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget