एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमदार बनसोडे यांच्यावरील गोळीबारासंदर्भात वेगळी माहिती समोर, नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या गोळीबारात आणखी माहिती समोर येत आहे. अटकेत असलेल्या कंत्राटदार ऍंथोनी यांचे मॅनेजर तानाजी पवारने जीव वाचविण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचा जबाब दिलाय. अशी पोलिसांमधील खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलीये. आमदार अण्णा बनसोडेंनी मात्र त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र घटनेला आठ तास उलटून गेल्यानंतर ही पिंपरी चिंचवड पोलिसांना गोळी लागल्याचं निशाण अद्याप सापडलेले नाहीत. तानाजी पवार यांचा जबाब आणि पोलिसांना गोळीचे खुणा न सापडणं या दोन्ही बाबी आमदारांचा दावा तूर्तास तरी फोल ठरवत आहेत. अशातच आमदारांनी तानाजी पवार यांच्याशी काल साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप देखील समोर आलीये. यात आमदार अण्णा बनसोडे हे तानाजी पवारला धमकावत आहेत.

*नेमकं काय संभाषण झालं*
आमदार : जहागीरदार तुला बोलावलेलं कळत नाही का? एवढे फोन केले उचलत नाहीस, कमीतकमी येऊन तर जा ना?
तानाजी पवार : मी काल फोन केला होता, तुम्ही फोन उचलला नाही. आपण योग्य भाषा वापरा, जहागीरदार वगैरे म्हणण्याची भाषा योग्य नाही. तुम्ही आमदार साहेब अहात म्हणजे आम्ही काहीही ऐकून घ्यायचं का?
आमदार - ( शिवीगाळ करायला सुरुवात केली.) एक काम कर तू कुठं आहे सांग मी तिथं येतो.
तानाजी पवार : साहेब मी मुंबईत आहे. पण आपण शिवीगाळ करायची गरज नाही. तुमचं काम काय अडलंय हे सांगा.
आमदार : तुझा मालक आजूबाजूला आहे का?
तानाजी पवार : यात मालकाचा काय संबंध आहे, मी मुंबईत माझ्या कामासाठी आलोय.
आमदार : नाही नाही सांगतो ना तुझ्या मालकाला. घे रे तो मोबाईल.
तानाजी पवार : बोला, बोला तुम्ही माझ्या मालकाशी बोला. काही अडचण नाही. ही तुमची भाषा ना एका जनप्रतिनिधीला शोभत नाही. आम्ही तुमच्याशी इज्जतीने बोलतोय आणि तुम्ही शिव्या देताय.
आमदार : (पुन्हा शिवीगाळ)
तानाजी पवार : आपण काय बोलताय हे आपल्याला तरी कळतंय का?
आमदार : तू काय बोलतो हे तुला कळतं का?
तानाजी पवार : मी काय बोलतोय तेंव्हा
आमदार : तू मालक नाही, कामगार आहे.
तानाजी पवार : मी कुठं म्हणतोय मालक आहे. तुम्ही शिव्या कशा देताय.
आमदार : बरं तू ये उद्या.
तानाजी पवार : येतो मी उद्या.
असं या संभाषण झालं आणि आज तानाजी पवार आमदारांना भेटायला त्यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर इथं ही वादावादी झाली. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पवारला मारहाण करत, कार्यालयाबाहेर आणलं. तेंव्हा नितीन पवारने त्याच्याकडे असणाऱ्या बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. ह्या गोळ्या माझ्या दिशेने झाडल्याचा दावा आमदारांनी तातडीनं केला. मात्र अद्याप ही गोळीच्या खुणा पोलिसांना आढळल्या नाहीत. अशातच घटनेनंतर अटकेत असलेल्या तानाजी पवारांनी आमदारांचे कार्यकर्ते मला बेदम मारहाण करत होते. माझा जीव जाण्याची शक्यता होती, म्हणून बचावासाठी मी हवेत गोळीबार केल्याचं तानाजी पवारने जबाबात म्हटलंय. अशी पोलिसांमधील खात्रीलायक सूत्राने माहिती दिलीये. त्यामुळे आमदारांचा स्वतःवर गोळीबार झाल्याचा दावा तूर्तास फोल ठरला आहे. अशातच काल झालेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला. यात ऍंथोनी यांच्या कार्यालयात आमदारांचे समर्थक आले होते. त्यांनी ऍंथोनी यांच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्राने हल्ला केला होता. हा प्रकार गोळीबारानंतर आमदारांनी सांगितला नव्हता. आमदारांच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेत नसल्याने हे प्रकार घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. आता परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Mahayuti Oath Ceremony : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी
Uddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरे
Mahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
जॅाब माझा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement