Sanjay Raut on Gajanan Kirtikar : गजानन किर्तीकर यांना उद्यापासून लोकं विसरून जातील ABP Majha
Sanjay Raut : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आमच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव गेलं, तरीही आमचा मोठ्या फरकानं विजय झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. या निवडणुकीत जनतेनं आम्हीला 68 हजार मतं दिल्याचे राऊत म्हणाले. खासदार गजाजन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, पक्षावर त्यांच्या जाण्याचा काही परिणाम होणार नसल्याचे राऊत म्हणाले. ते जरी तिकडे गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर हे आमच्यासोबत आहेत आणि राहतील असे राऊत म्हणाले. मला तुरुंगात टाकले तरीसुद्धा मी पार्टीसोबत आहे. संकटात पार्टीबरोबर जे असतात त्यालाच निष्ठा म्हणतात असेही राऊत म्हणाले.



















