एक्स्प्लोर

Sanjay Raut: संजय राऊतांचा माझा कट्ट्यावर दावा, 'बंडखोर आमदार नक्कीच परतणार, त्यांना जाण्याची गरज नव्हती'

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी बंडखोर आमदारांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, हे सगळे जिवाभावाचे सहकारी आणि मित्र होते.

Sanjay Raut: 'बंडखोर आमदार नक्कीच परत येतील याची मला खात्री आहे. त्यातील काही आमदार हे नक्कीच परततील.', असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझा माझा कट्ट्यावर बोलताना केला. बंडखोर आमदारांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, हे सगळे जिवाभावाचे सहकारी आणि मित्र होते.

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली. ईडीचा (ED) चौकशीचा ससेमिरा, त्यांना झालेली अटक तुरुंगात आलेले आनुभव याबाबत त्यांनी सांगितलं. कोणत्या बंडखोर आमदाराच्या विषयी तुम्हाला ओलावा आहे? असा प्रश्न  विचारल्यानंतर संजय राऊत यांनी उत्तर दिलं, 'मला सगळ्यांविषयी ओलावा आहे त्यांना जाण्याची गरज नव्हती. एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी असतील, हे सगळे जिवाभावाचे सहकारी आणि मित्र होते. अशाप्रकारे ते जातील याची कल्पना काही लोक उद्धव ठाकरेंना देत होते पण विश्वास बसत नव्हता कारण त्यांना वाटत होते की, ती लोकं आपलीच आहेत.' असं ते म्हणाले.

आम्ही एका ताटात जेवणारी माणसं होतो: संजय राऊत

पुढे बंडखोर आमदार यांच्याबाबत संजय राऊत म्हणाले, 'ते सर्वजण माझे सहकारी होते. पक्षाचा नेता म्हणून मी त्यांच्यासोबत अनेकदा बोलत होतो. आम्ही एका ताटात जेवणारी माणसं होतो. त्यांचा विजय झाल्यावर रश्मी ठाकरे यांनी त्यांना ओवाळलेलं आहे. त्यांच्यावरती काही दबाव असतील. त्यांना तुरुंगात जायचं नव्हतं माझ्यासारखा माणूस तुरुंगात गेला मी गद्दारी केली नाही. मलाही तडजोडीची संधी होती पण मी स्वीकारली नाही. मी खूप खंबीर आहे. मी पक्षाबाबत ठाकरे कुटुंबाबत कृतज्ञ आहे.'

 संजय राऊतांनी सांगितल्या तुरुंगातील आठवणी

'100 दिवसानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ज्या शिवसेनेत माझा जन्म झाला, त्या शिवसेनेचं नाव बदललं गेलं. ज्या शिवसेनेसाठी मी 40 वर्ष दिले, त्या शिवसेनेचं नाव चोरलं गेलं. ज्या धनुष्यबाणासाठी रस्त्यावर लढलो, ते राहिलं नाही. तुरुंगात असताना हे सर्व पाहत होतो. त्यावेळी तुरुंगाच्या गजावर हात ठेवत मी अस्वस्थ होत होतो.' असंही संजय राऊत यांनी सांगितलं. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Sanjay Raut Majha Katta Live Video : पत्राचाळ कुठे आहे तेच माहित नाही, तुरुंगातील एकेक तास 100 तासांसारखा, माझा कट्ट्यावर संजय राऊत!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget