मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरुच,पंकजा मुंडे यांचं पुढचं पाऊल काय?
खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्याने मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ भाजप पदाधिकाऱ्यांकडून राजीनामासत्र सुरु आहे. बीडसह मुंबई आणि नगरमधील मुंडे समर्थकांनी राजीनामे दिलेत. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे उद्या दुपारी बारा वाजता समर्थक पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. कालच पंकजा मुंडे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे दिल्ली वारीनंतर पंकजा मुंडे समर्थकांसमोर काय भूमिका मांडणार याकडं लक्ष लागलंय. गेली दोन वर्ष आणि सत्तेतली पाच वर्ष पक्षावर नाराज असणाऱ्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पाऊल काय असेल याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय.





















