एक्स्प्लोर
Pandharpur Wari | उगले दाम्पत्याला Vitthal महापूजेचा मान, CM फडणवीसांकडून सन्मान
नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्याला विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते उगले दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. त्यांना शाल आणि विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन गौरवण्यात आले. यासोबतच उगले दाम्पत्याला एक वर्षाचा एसटीचा मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला. मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. "असं वाटत नव्हतं की फडणवीस साहेबांसोबत आणि त्यांचं दर्शन व्हईल वा पूजा भेटेल असं वाटत नव्हतं," असे त्यांनी सांगितले. पंधरा वर्षांपासून पायी वारी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. विठ्ठलासोबत महापूजा करण्याचा योग आल्याने ते धन्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांना असा योग येईल असे वाटले नव्हते, मात्र विठ्ठलाने त्यांचे मागणं ऐकले असे ते म्हणाले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा





















