एक्स्प्लोर
Palghar Heavy Rain : पालघरमध्ये पावसाचा जोर, नदीला पूर आल्याने गावांकडे जाणारे रस्ते बंद
पालघर जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सूर्या नदीला मोठा पूर आला असून वैतरणा, पिंजाळ या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे पाणी गावांमध्ये शिरले आहे. सारणी उर्से, ऐना या रस्त्यांवर पाणी आल्याने जवळपास दहा ते पंधरा गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. भातशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवरही पावसाचा परिणाम झाला असून रेल अलर्ट देण्यात आला आहे. धरणांची पाणी क्षमता पूर्ण झाल्यामुळे धरणांचे पाणी सोडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पाणी आणखी वाढू शकते. जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. “जर महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा” अशी सूचनाही नागरिकांना देण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत





















