ओबीसींच्या मुद्द्यावर वडेट्टीवार- बावनकुळेंची भेट, इम्पेरिकल डाटा मिळवण्याची बावनकुळेंची मागणी
काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे, या वक्तव्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर काँग्रेस आमदार यांनी केलेला आरोप खरा असेल तर तत्काळ काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं अशी मागणी काँग्रेसकडे केली होती. त्यानंतर आज थेट काँग्रेस मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात जवळपास पाऊण तास भेट घेऊन चर्चा केली. या चर्चांमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे ओबीसी आरक्षण प्रश्नी तत्काळ पाऊल उचलण्यात यावं. इम्पीरिकल डेटा डिसेंबरच्या आत गोळा करून तत्काळ ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करावं, अशी मागणी बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्याकडे केली.





















