(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Oil Shortage : पुढच्या दोन ते तीन दिवसात काही जिल्ह्यांत इंधन तुटवडा जाणवण्याची शक्यता
मनमाड जवळच्या पानेवाडी टर्मिल येथिल इंडियन ऑईल प्रकल्पातील टँकर चालकांनी आज सकाळ पासून संप पुकारल्याने प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प झालाय.या प्रकल्पातून राज्यातील सहा जिल्हयां मध्ये टँकरद्रवारे इंधन पुरवठा होत असतो.मनमाड-औरंगाबाद या रस्त्यावर सध्या प्रचंड खड्डे पडले त्यामुळे वाहतूकीचा मार्ग बदलून द्यावा तर टेंडर मध्ये मनमानी प्रकल्प व्यवस्थापक करत असल्याने ट्रान्सपोर्ट मालकांनी हा संप पुकारला असून या प्रकल्पातून जानारे इंधन सरकारी अस्थापनांना पुरवठा केला जातो.त्यामुळे संप अधिक काळ लांबला तर अनेक ठिकाणी त्याचा परिणाम जाणवणार असून येथून दिवसभरातून पेटेरोल पंप मालक आणि ट्रान्सपोर्टर यांच्या ५०० टँकर भरुन इंधन वाहतूक करीत असतात. सध्य परिस्थितीला टँकर चालक पोलिस प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थाप यांच्या बरोबर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरु आहे.यातून काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.