OBC Political Reservation प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिल्यानंतर आज महाविकास आघाडीने महत्त्त्वाची बैठक बोलावलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी १ वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी केली जाणार असून आगामी निवडणुकांबाबत चर्चा होईल. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. सध्या १५ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यावी लागण्याची शक्यता आहे.




















