Atul Save VS Nandkumar on OBC : मंत्री अतुल सावे आणि अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांच्यात वाद?
ओबीसी म्हणजेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे (Atul Save) आणि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार (Nandkumar) यांच्यात विविध निर्णयांवरून खडाजंगी सुरू असल्याचं कळतंय. २४७ पदांची भरतीचं कंत्राट कंपनीला निविदेविनाच देण्यावरून नवा वाद पेटला आहे. त्यावरून मंत्री अतुल सावे यांनी नंदकुमार यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. यापुढे कोणतेही निर्णय परस्पर घेऊ नका, असं मंत्र्यांनी नंदकुमार यांना कळवलं आहे. ओबीसी कल्याणासाठी स्थापन केलेल्या महाज्योती संस्थेला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, आणि निविदा न काढताच हे कंत्राट देण्यात आल्याच्या तक्रारी मंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना खरमरीत पत्र लिहिलंय. या वादाबाबत मंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिवांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. एबीपी माझा या दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतेय.....