(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Thombre MNS : संदीप देशपांडेंच्या समोरच हातातून शिवबंधन काढले, ठोंबरेंचा थेट मनसेत प्रवेश
गाठी भेटीच्या दरम्यान संदीप देशपांडे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या गटप्रमुखाने शिवबंधन हातातून काढले आणि ऑन द स्पॉट मनसेत प्रवेश केला...
मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत वरळी मध्ये पाहायला मिळणार आहे. संदीप देशपांडे यांनी वरळी मध्ये गाठीभेटीना सुरुवात केलेली आहे . देशपांडे यांच्याकडून वरळी करांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत या सगळ्या गाठी भेटीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले आणि मनसेत प्रवेश केला गेल्या काही दिवसापासून वरळी मधले राजकीय वातावरण तापले आहे जांभोरी मैदान येथे ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते . त्यामुळे आगामी काळामध्ये वरळीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंचे शिवसेना ही विधानसभेची लढत चांगलीच चर्चेत राहणार आहे.