(Source: Poll of Polls)
Nilesh Lanke : सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ४० केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे...यावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे...सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा...अशी प्रतिक्रिया लंके यांनी दिलीये...सोबतच विखे कुटुंबाचा इतिहास असाच आहे, यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबियांनी असेच केले होते असं म्हणत त्यांनी 1991च्या निवडणुकीची आठवण करून दिली...सोबतच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित करत विखेंनी एक प्रकारे केंद्रीय यंत्रांवरच आक्षेप घेतला असं लंके म्हणाले...तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून आलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी निलेश लंके यांच्यावर टीका करत भाजपकडून त्यांना मदत झाली किंवा नाही याबाबत बोलण्यापेक्षा लंके गजा मारणेला का भेटले यांचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे अशी टीका केली होती याला देखील निरीक्षण करणे उत्तर देत जे जनतेतून निवडून आले नाहीत त्यांच्यावर मी बोलणार नाही असं म्हणत त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला...निलेश लंके यांच्याशी बातचीत केलीये आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ