एक्स्प्लोर
Nilesh Ghaighaiwal Viral Video | गुंड Nilesh Ghaighaiwal चे राजकीय संबंध उघड, Police कारवाईच्या तयारीत
गुंड निलेश घायघाईवळ यांचे सातत्याने राजकीय संबंध समोर येत आहेत. आमदार रोहित पवारांनी या संदर्भात काही आरोप आणि दावे केले होते, त्यानंतर हे व्हिडिओ समोर आले आहेत. आमदार संतोष बांगर यांच्यासोबत गुंड निलेश घायघाईवळ एकाच गाडीतून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी निलेश घायघाईवळ यांचा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आता रोहित पवार यांच्या आईच्या एका कार्यक्रमातील निलेश घायघाईवळचा व्हिडिओ आणि रोहित पवार यांच्यासोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलेश घायघाईवळ फरार असतानाही त्याचे राजकीय संबंध अधोरेखित होत असल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकरणावरून पोलीस प्रशासन आता कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पोलिसांना आता कुठेतरी कारवाई केल्याचं आपल्याला दिसतंय आणि पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रीडा
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement


















