Narendra Patil : लोकसभेनंतर विधानसभेलाही महायुतीला फटका बसणार,आण्णासाहेब पाटलांचा घरचा आहेर
'लोकसभेनंतर विधानसभेलाही महायुतीला फटका बसणार'
अण्णासाहेब महामंडळाचे ६१ कर्मचाऱ्यांना काढल्याने व्याज परताव्यावर परिणाम
लोकसभेला महायुतीला मराठ्यांचा फटका बसला असतानाच विधानसभेतही याची पुनरार्वत्ती होईल असा खरचा आहेर आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या ६१ नवीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढण्याचा निर्णय हा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम . डी. मंगेश मोहिते यांनी घेतला आहे. एकीकडे १ लाख मराठा उद्योजकाचे टार्गेट पूर्ण होत असताना दुसरीकडे जिल्हास्तरीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने व्याज परताव्यावर परिणाम होणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला (BJP) अपेक्षित यश मिळालं नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक जागा घटल्या. त्यामुळे, स्वबळावर बहुमत मिळवण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं. लोकसभा निवडणुकीतील या पराभवाची कारणमिमांसा आणि मंथन भाजपकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांच्या अनुषंगाने काही संघटनात्मक बदलही होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यातील संघटनात्मक बदलही केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.