(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Modi Special Report : सुरतेची लूट; राजकीय आक्रमण, रायगडावर मोदी काय म्हणाले होते ?
Narendra Modi Special Report : सुरतेची लूट; राजकीय आक्रमण, रायगडावर मोदी काय म्हणाले होते ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, आपल्याला चुकीचा इतिहास शिकवण्यात आला असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि त्यावरून आता राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. त्याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तब्बल 10 वर्षांपूर्वी वक्तव्य केलं होतं आणि तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
संभाजी भिडे यांनी आयोजित केलेल्या धारातीर्थ यात्रेच्या निमित्ताने 5 जानेवारी 2014 रोजी नरेंद्र मोदी रायगड किल्ल्यावर आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी केलेले भाषण आता व्हायरल होत आहे. शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, त्यांनी सूरत लुटली असा शब्दप्रयोग करून इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा घोर अपमान केल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून केला. सूरतमध्ये औरंगजेबचा खजिना होता आणि शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला. या कामात शिवाजी महाराजांना सूरतमधील स्थानिक लोकांची मदत झाली असं नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं.