![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sindhudurg District Bank Election : गुलाल, फटाके, फुगडी आणि राणेंचा धूमधडाका
Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व दिसून येत आहेत. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय, तर आठ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागलं होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं.
![Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/bd56548c9902fcf9a026409ba04493d11720377891745976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/3f4ac0401f863a73c446a347253d6b9d1720377602990976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/b641c31806ffb9f8290999416dc7a9ca1720376124378540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/24a2fa131d3efd2271ecfa27cc28be0d1720375883007976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/bea9facbdb4552ee9bca3e5dff84c1d71720375738586540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)