(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19 vaccination : नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ
नांदेड जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने प्रत्यक लसीकरण केंद्रास दररोज 100 लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु लसींचा हा अत्यल्प लाभ सुरळीत व निकोप देण्यास प्रशासनाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत ठरलंय. कारण नांदेड शहरातील गुरु गोविंदजी शासकीय रुग्णालयात लसीकरणाच्या या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्राच्या कक्षात गोंधळ घातलाय. शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीकरणाचा दूसरा डोस न देता निकटवर्तीय व नातेवाईकांना याचा लाभ देत असल्याचा आरोप करत गोंधळ घातलाय. लसीकरणासाठी नोंदणी केलेले नागरिक सकाळी सहा वाजल्या पासून रांगेत ताटकळत उभे राहतात सुरवातीला पाच दहा रांगेतील नागरिकांना लस दिल्या जाते व नंतर आरोग्य अधिकारी ,कर्मचारी आपल्या निकटवर्तीयांना च लस देतात व नंतर लस संपली असे सांगतात असा आरोप नागरिक करत आहेत.त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी लसीकरण कक्षात राडा घातलाय.लसीकरण केंद्रावरील हा गोंधळ व तंटा मिटवण्यासाठी शेवटी पोलिसांना बोलावून वातावरण निवळण्यात आलंय.