Nana Patekar Full PC : लोकसभा निवडणूक लढवणार का? नाना पाटेकर यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Nana Patekar On Politics: मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली असल्याचे मोठं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केले. मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.मागील दिवसांपासून नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना नाना पाटेकर यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नाना पाटेकर राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली.
आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेक आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी आपली राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. नाना पाटेकर यांनी म्हटले की, मला सर्वच पक्षातून ॲाफर आहे. पण मला ते जमणार नाही, लोकांनी ठरवले पाहिजे. मी मूळात राजकारणात जावू इच्छित नसल्याचेही त्यांनी म्हटले. पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना नाना पाटेकर यांनी मला कळवा कुठून निवडणूक लढवायची असा उलट प्रश्न केला.कितीही प्रश्न विचारले तरे तुम्ही मला पकडू शकत नाही असेही नाना पाटेकर यांनी म्हटले. नाम फाऊंडेशनची सुरुवातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी झाल्या आहेत. हमी भाव योग्य मिळाला तरच आत्महत्या रोखतां येतील. या सरकारकडून अपेक्षा असल्याचे सांगतया गोष्टी चुटकी सरशी सुटतील असं नाही हेदेखील नाना पाटेकर यांनी नमूद केले.