एक्स्प्लोर
Sangali: सांगलीत पालिका, पोलिसांचा अजब कारभार, सामान्यांकडून दंड वसूल ABP Majha
सांगली जिल्ह्यात आणि पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. याच पार्श्वभूमीवर कोरोना नियम मोडणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर दंडात्मक कारवाई करण्यात येतेय. मात्र त्याच वेळी कोरोनाचे निर्बंध झुगारुन खुल्या मैदानावर तुफान गर्दीत कबड्डी सामने खेळवले जातायत. सांगलीवाडीत नदीकाठच्या चिंचबाग मैदानावर प्रचंड गर्दी आणि कोरोना नियम पायदळी तुडवत हे सामने खेळवले जातात. या ठिकाणी सामने पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मास्क पाहायला मिळत नाही. शिवाय आयोजकांच्या चेहऱ्यावरुनही मास्क गायब आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही असा आरोप होतोय..
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















