MVA Seats Allocation : मविआचं जागावाटपाचं घोंगडं भिजत ;काही जागांचा पेच कायम
MVA Seats Allocation : मविआचं जागावाटपाचं घोंगडं भिजत ;काही जागांचा पेच कायम
महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रितपणे सामोरी जाणार आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार , काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जागा वाटपासाठी बैठका सुरु आहेत. जागावाटपावर चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून पक्षानं अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज जिल्हाध्यक्षांमार्फत अर्ज सादर करावेत, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांननी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक- 2024 लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हाध्यक्षांमार्फत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे अर्ज 5 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रदेश कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.