एक्स्प्लोर
Mumbai Rains: अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ, Kurla परिसरात जोरदार हजेरी
मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून, कुर्ला (Kurla) परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि ठाण्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ होत असल्याचे वृत्त आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून, काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, मात्र नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















