एक्स्प्लोर
Mumbai One App | PM Modi यांनी दिले मुंबईकरांना मोठे गिफ्ट, एकाच App वर सर्व वाहतूक सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो तीनच्या अखेरच्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात 'मुंबई वन ॲप'चे अनावरण केले. हे ॲप मुंबई आणि आसपासच्या महानगर प्रदेशातील (MMR) नागरिकांसाठी एक मोठे गिफ्ट आहे. या ॲपमुळे मुंबई महानगर प्रदेशातील अकरा सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकच तिकीट काढता येणार आहे. यामध्ये मुंबईतील विविध मेट्रो मार्ग, उपनगरी लोकल सेवा, मोनोरेल आणि मुंबई व आसपासच्या महानगरांमधील बस सेवांचा समावेश आहे. प्रवाशांना या ॲपवर विविध सेवांची वेळापत्रके, त्यांचे मार्ग आणि तिकिटांचे दर पाहता येतील. 'मुंबई वन ॲप' सध्या Google Play Store (Android) आणि Apple App Store (iOS) वर उपलब्ध आहे. हे ॲप वापरण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. 'क्विक तिकीट', 'प्लॅन जर्नी' आणि 'नियर बाय स्टेशन' असे विविध पर्याय यात उपलब्ध आहेत. एमएमआरडीएकडून (MMRDA) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲप लॉन्च करण्यात आले आहे, ज्यामुळे एकाच तिकिटाच्या माध्यमातून विविध वाहतूक साधनांचा वापर करणे सोपे होईल.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















