(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron : ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिकेची मुंबईत खबरदारी : Kishori Pedekar UNCUT
कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे (Omicron)दोन रूग्ण सापडल्यानंतर आता इतर राज्यांच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रातही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनेही (mumbai municipal corporation)आता ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedekar)यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळांकडून आलेली सर्व माहिती आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार आहे. ही माहिती मुंबईमधील 24 वॉर रूमला कळवळी जाणार आहे. वॉर रूम मधून 7 दिवस प्रवाशांसोबत संपर्क ठेवला जाईल. प्रत्येक वॉर्ड मध्ये 10 रूग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेचे पथक घरी जाऊन रूग्णांची तपासणी करेल. ज्या सोसायटीमध्ये रुग्ण आढळतील त्या सोसायटीच्या लोकांची मदत घेतली जाणार असून त्यांना तसे पत्र देण्यात येणार आहे. नागरिकांनी सजग राहून आम्हाला माहिती द्यावी आणि सहकार्य करावे. आपल्या सोसायटीमध्ये कोणी प्रवाशी आला तर त्याची माहिती पोलिसांनी द्यावी, असे आवाहनही महापौर पेडणेकर यांनी केले आहे.