Pune Corona : पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टातून थेट कॉल
मुंबई : पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत मुंबईत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर वाईट व्यवस्थापना बाबतीत पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टानं कोर्टातून थेट कॉल लावला. तर वेबसाईटवर पाच व्हेंटिलेटर बेड असूनही, हेल्पलाईनवरील महिलेनं बेड उपलब्ध नसल्याचं फोनवर सांगितलं.
पुणे महापालिकेचं व्यवस्थापन कोर्टात उघड पडल्याने अश्या पद्धतीनं फोनकरून खातरजमा करणं योग्य नाही. हेल्पलाईनवर काम करणारी व्यक्ती डॉक्टर नसते, अशी पुणे महापालिकेने हायकोर्टात सारवासारव केली. दरम्यान महापालिकेने सर्व फोन ऑपरेटर्सना ट्रेनिंग देणार असल्याचं कोर्टात सांगितलं आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश सीजे दत्ता म्हणाले की पुढच्या वेळीही फोन लावून अशीच खातरजमा करु.
लोकसंख्येच्या तुलनेत पुणे सर्वाधिक कोरोना चाचण्या करणारं शहर आहे. शहरात 40 लाख लोकसंख्येपैकी 22 लाख लोकांच्या कोरोना चाचण्या केल्याची पालिकेची माहिती. पुण्यात आजवर कोरोनामुळे 7300 जणांचा मृत्यू झाल्याचही पालिकेने सांगितलं आहे.























